Headlines

मालवण देवली येथे भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू; एक अत्यवस्थ…

⚡मालवण ता.१६-:
मालवण तालुक्यातील देवली पुलानजीक मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवली येथून कुंभारमाठच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत ओंकार भावा निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय१० ) यांचा मृत्यू झाला.

या अपघातात सचिन अंकुश निकम हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळीरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच तत्परतेने घटनास्थळी धाव घेत. प्रो. डीवायएसपी शेलारसाहेब , एपीआय गणेश माने, एपीआय पंडित पाटील, पीएसआय भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, कॉ. पाटील यांनी अपघाताची माहिती घेतली. दरम्यान माजी नगरसेवक आप्पा लुडबे, शिवसेना तालुका प्रमुख मंदार लुडबे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य. केले

अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

You cannot copy content of this page