तीर्लोट आबेरी येथे उभारलेल्या स्टॅण्डचे करण्यात आले लोकार्पण

माजी विद्यार्थ संघ मुंबईचा पुढाकार

देवगड ता.२४-:* तिलोॅट आंबेरी माजी विद्यार्थी संघ मुंबई यांचे पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि आंबेरी वाडीचे रहिवासी व हितचिंतक,यांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथ आणि श्री देवी भावकादेवी यांच्या निशाण स्थळ तोरणाची झाळ या ठिकाणी निशाण उभे करण्याकरिता तिलोॅट आंबेरी माजी विद्यार्थी संघ मुंबई यांचे वतीने स्टॅण्ड बांधण्यात आला.त्याचे उदघाटन पाळीदार गणपत घाडी व रविंद्र घाडी यांचे हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला .

तसेच तिलोॅट आंबेरी माजी विद्यार्थी संघ मुंबई यांनी आंबेरी शाळा बस थांबा शेड वास्तू नुतनीकरण बांधकाम करण्यात आले.त्याचे उदघाटन संस्थेचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे सल्लागार नारायण शंकर पडेलकर व आंबेरीतील उपस्थित जेष्ठ नागरिक आणि जमिनींचे मालक जुवाटकर बंधू यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.सदर दोन्ही उपक्रम सोहळा साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेरी वाडीतील रहिवाशी हितचिंतक उपस्थितोत. ढोल ताशांचे गजरात व फटाक्यांच्या आताशबाजी करून करण्यात आले. .

मान्यवरांनी मार्गदर्शन करून तिलोॅट आंबेरी माजी विद्यार्थी संघ मुंबई यांच्या या दोन्ही उपक्रमांचे कौतुक केले आणि भविष्यातील उपक्रमांना आर्थिक सहकार्य करण्याचे घोषित केले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस . राजेंद्र (राजू) पडेलकर यांनी केले.सर्व उपस्थितांचे आभार मानून संस्थेचे अध्यक्ष दिपक हरिश्चंद्र भाबल यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

You cannot copy content of this page