अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर;मनसे उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री यांचा इशारा
कणकवली ता.२४-:* जिल्हय़ातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती दयनिय आहे. सर्वसामान्याना आवश्यक सेवा मिळत नाही. पुरेशा प्रमाणात डॉक्टर उपलब्ध नाहीत.हि जरी वस्तुस्थिती असली तरीही उपचार करणाऱ्या डॉक्टरानी योग्य सेवा देण्याची गरज आहे.
वैभववाडीमध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यासोबत रुग्णावरील उपचारावरून केलेले वर्तन चूकीचे आहे. मनसे पदाधिकाऱ्यासोबत बोलताना अशा अधिकाऱ्यानी तारतम्य बाळगावे, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर द्यावे लागेल, असा इशारा मनसेचे उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री यानी दिला आहे. वैभववाडी येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णावर तातडीने उपचार करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. काही ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार न करता तज्ञ डॉक्टर नसल्याचे सांगून रुग्णाना पुढे पाठविले जाते. तेथे प्राथमिक उपचार करण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. उलट रुग्ण वा नातेवाईकांना चूकीची वागणूक दिली जाते.
वैभववाडी येथे अशाचप्रकारे रुग्णाच्या नातेवाईकांना चूकीची वागणूक दिल्याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येथे मनसेचे उपतालुकाध्यक्ष डॉक्टराना उपचाराबाबत विनंती करीत असतानाही त्यांनी चूकीच्या पद्धतीने उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुळात अधिकाऱ्यानी अशी उत्तरे देणे योग्य नाही. अधिकाऱ्यानी मनसेच्या पदाधिकाऱ्यासोबतच नव्हे तर सर्वसामान्य नागरीकांशी बोलतानाही तारतम्य बाळगून बोलावे. अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर द्यावे लागले, असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यानी दिला आहे.
