सावंतवाडी विठ्ठल मंदिरात दहा दिवसीय योगप्राणायाम शिबिर

पतंजली योग समिती व विठ्ठलमंदिर देवस्थान उपसमिती संयुक्त विद्यमाने आयोजन : दिनांक 1 ते 10 एप्रिल दरम्यान होणार कार्यक्रम

सावंतवाडी ता.२४-:* गुढी पाडवा नववर्षाचे औचित्य साधून पतंजली योग समिती सावंतवाडी व विठ्ठलमंदिर देवस्थान उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्षानंतर हा प्रथमच विठ्ठल मंदिर येथे नगरवासीयांच्या आरोग्यासाठी दहा दिवसाचे योगप्राणायाम शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबीर 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत सकाळी 6 ते 7 30 या वेळेत दिलीप नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या शिबिरास स्थायी वर्गाचे संचालक रामनाथ सावंत व महादेव परब यांच्यासोबत दत्तात्रय निखार्गे, शरद कालेलकर, रावजी परब, तानाजी वरक, दिलीप भाईप, प्रमोद चोडणकर, मीना सामंत सत्र घेणार आहेत तर विशेष मार्गदर्शन करण्यासाठी प्रा सुभाष गोवेकर, इंजिनियर दत्तात्रय सडेकर, डॉ लवु सावंत व सौ विद्या गोवेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

शेवटच्या दोन दिवसात हे शिबिर शिवउद्यान येथे होणार असून या शिबिरास आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी डॉक्टर उपस्थित राहणार आहेत या वेळी सूर्य नमस्काराचा जागतिक विक्रम केलेले विद्याधर पाटणकर बांदा खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण पावसकर व पतंजलीचे समन्वयक विकास गोवेकर हे मार्गदर्शन करणार आहेत या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नगरवासीयांनी घ्यावा असे आवाहन भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष महेश भाट यांनी केले आहे

You cannot copy content of this page