…म्हणूनच सत्ताधारी तिन्ही पक्ष तसेच विरोधी भाजपा बदनाम

एकमेकांची उणीधुनी काढण्यात सत्ताधारी आणि विरोधक व्यस्त :परशुराम उपरकर

कणकवली ता.२४-:* एकेकाळी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाची प्रतिष्ठा ठेवली जात होती. आमदारांचे विविध प्रश्न तसेच मतदारसंघाचा विकासनिधी, तसेच सांघिक विकासकामे याबाबत मांडणी केली जात असे मात्र सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमेकांची उणिधुनी काढत, लोकप्रतिनिधी कोट्यवधीची माया कशी जमा करतात हे दाखवून देत जनतेची करमणूक केली जात आहे. वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. मंत्र्याला जमणार नाही असे आर्थिक घोटाळे अधिकारी करतात हेही उघड होत आहे. त्यामुळे सत्ताधारी तिन्ही पक्ष तसेच विरोधी भाजपा पक्ष बदनाम होत आहेत. असा टोला मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर बोलत होते. ते म्हणाले, टक्केवारीच्या राजकारणात डीपीडिसीचा निधी मागील वर्षी अखर्चित राहिला. जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन, पीएचसीतील डॉक्टरांची पदे भरण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. निधी स्वतः साठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी वापरला जात आहे.प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे घोटाळे केले जात आहेत.त्यामुळे लोकप्रतिनिधी जनतेसमोर बदनाम होत आहेत. आज कोणताही मंत्री अथवा आमदार मतदार संघात किती निधी आणला हे सांगत नाहीत कारण टक्केवारीचे गणित साधले जात आहे. जनतेच्या विकासासाठी खर्च होणाऱ्या निधीवर स्वतः लक्ष ठेवून जनतेने दर्जेदार काम करून घेणे गरजेचे आहे यासाठी जनतेने आतापासूनच पुढाकार घ्यावा असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page