Headlines

देवसू येथे दोन घरांत चोरी; १४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास…

⚡सावंतवाडी ता.११-: देवसू-मधलीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत घरफोडी करून रोख रकमेसह पितळ, तांबे, चांदी व स्टीलच्या भांड्यांसह सुमारे १४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १८ जुलै ते १० ऑगस्टदरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत प्रदीप शांताराम नाईक (वय ५७, रा. देवसू-मधलीवाडी, सध्या रा. ओरोस पोलीस कॉलनी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page