मालवण (प्रतिनिधी)
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण उपक्रमात मालवण शहरातून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रभाग सात मधील शिंदे शिवसेना पक्षाचे बिएलओ आणि पक्षाचे मालवण शहर बिएलओ उपसमन्वयक विशाल आचरेकर यांचा मालवण मेढा येथील शंकर मंदिरमध्ये स्थानिक नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक सुदेश आचरेकर आणि शंकर मंदिर मित्रमंडळ यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.
प्रभागातील सर्व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विशाल आचरेकर यांनी घेतलेल्या मेहनतीचे नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी कौतुक करत शहरातून बिएलओ म्हणून उत्तम काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी नरेश हुले, अभय कदम, हेमंत कोचरेकर, उदय मोंडकर, राजेश वाघ, मनोज आचरेकर, हरेश ढवळे, अनिकेत जोशी, सचिन टिकम, जयेंद्र लोणे, राजू इब्रापूरकर, उमेश हुले, नितेश पेडणेकर, दर्वेश आचरेकर, सुशांत कोचरेकर, रोहित खडपकर, बाबा मुकादम, वासुदेव खडपकर, जितेश ढवळे, यतीन केळुसकर, सिद्धेश मलिये, बाबा सरकारे, योगेंद्र कुबल, जितेंद्र लोणे, राजू कांदळगावकर, जितेश जोशी, नितीन धुरी, करण कुबल, प्रणित जोशी, तेज कोचरेकर, जय कोचरेकर, श्रीजय तांडेल, गजा सरकारे, राजु डिंगणकर, केदार पराडकर, हरेश गोवेकर, ऐजास मुल्ला, प्रसाद सरकारे, मयुरी सरकारे, योगेश मेस्त्री, गौरांगी जोशी, रोहित जोशी, काव्या सरकारे आदी व इतर उपस्थित होते.
