⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी पोलीस स्टेशन मधून पोलीस निरीक्षक चव्हाण यांची नुकतीच बदली झाली त्यांनी सावंतवाडी शहरात अतिशय उत्कृष्टपणे सेवा बजावली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारला.
त्यांना शुभेच्छा देण्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे, उपाध्यक्ष प्राध्यापक शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, सदस्य रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, रवी जाधव व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी त्यांची भेट घेतली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे नेहमीच पोलीस यंत्रणेला सहकार्य करत आलेला आहे.
निस्वार्थपणे सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या या संस्थेची आज शासकीय क्षेत्रांमध्ये तसेच अडी-अडचणीला मदत घेतली जाते. सदर संस्थेच्या सेवाभावी कार्याचा आढावा घेऊन मगदूम यांनी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करून म्हणाले की आपल्या संस्थेसोबत काम करायला मला नक्कीच आवडेल कारण समाजामध्ये निस्वार्थपणे सेवा देणारे तुमचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे तुम्हा सर्वांना भेटून खूप बर वाटलं अशी भावना त्या भेटी प्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
