वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी थोरात यांनी पीएमसी दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेला भेट देत मुलांची घेतली उजळणी.
पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी श्री थोरात यांनी मंगळवारी वैभववाडी शहरातील पीएमसी दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची उजळणी घेतली व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले यावेळी पालक सभाही असल्याने पालक सभेत ही पालकांनाही मुलांचा अभ्यास कसा घ्यावा मुलांना काय पाहिजे माहिती देत पालका नाही त्यांनी मार्गदर्शन केले. शाळा सुरू झाल्यापासून गटशिक्षण अधिकारी यांची ह्या शाळेला ही तिसरी भेट असल्याने पालकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव शाळा समितीचे नूतन अध्यक्ष तेजस साळुंखे उपाध्यक्ष कळसुरकर मॅडम पालक तथा वैभववाडी शहराच्या नगरसेविका सुनिता चव्हाण पालक स्वप्निल धुरी राजा गजोबार रत्नमोल निकम श्री जंगम शिंदे मॅडम दळवी मॅडम पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी थोरात यांच्याकडून पीएमसी दत्त विद्यामंदिरची पाहणी; विद्यार्थ्यांची घेतली उजळणी…
