Headlines

Global Maharashtra Breaking News

महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाना बूस्टर डोसचे लसीकरण संपन्न…

कुडाळ ता.१९-: आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग आणि महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व बाहूस्त्रोत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी बूस्टर डोस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी एकूण 465 जणांना बूस्टर डोस चे लसीकरण करण्यात आले आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी…

Read More

स्ट्रीट फूड वेंडरचे प्रशिक्षण घेतलेल्याना मिळणार कर्ज

कौशल्य विकास प्रधान सचिव मनीषा शर्मा यांनी दिला शब्द ⚡सावंतवाडी ता.१९-: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्ट्रीट फूड वेंडर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचे प्रस्ताव तयार करा, त्यांना कर्ज उपलब्ध करून देवू असा शब्द कौशल्य विकास केंद्राच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिला आहे.दरम्यान येथील एस. एस. आय कम्प्युटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या केंद्रात विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षण दिले…

Read More

मालवण पोस्ट कार्यालयासमोरील साचणाऱ्या पाण्याची समस्या सोडवा

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी ⚡मालवण ता.१९-: मालवण पोष्ट ऑफिस समोरील मेकॅनिकल रोड येथे सतत साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने या ठिकाणी गटार खोदाई करून त्यावर लाद्या टाकण्याची मागणी मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे मालवण शहरातील मेकॅनिकल…

Read More

सावंतवाडी ब्राह्मण मंडळतर्फे गुणवंतांचा सत्कार

⚡सावंतवाडी ता.१९-: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी ब्राह्मण मंडळ कडून 10वी,12वी ग्रॅज्युएट स्कॉलरशिप मुलांचा महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित गुणगौरव कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.एकूण 23 मुलांचा सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ मृदुला महाबळ अंबापुरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी डॉ.महाबळ अंबापुरकर यांनी उपस्थित मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा मंडळ…

Read More

लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिन ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करावा

कोकणच्या साहित्यिकांसह मराठी लेखकांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खुले पत्र ⚡कणकवली ता.१९-: लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे यांचा, १ ऑगस्ट हा जन्म दिन, ” लेखन प्रेरणा दिन ” म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका खुल्या प्रदोरे कोकणच्या साहित्यिकांसह मराठी साहित्यिक, कलावंत आणि विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. साहित्यिक,कलावंत,सांस्कृतिक, सामाजिक संघटनांनी सदर मागणी…

Read More

केसरकर हे वागणे योग्य नव्हे

इंदोर अपघातात नागरिक मृत झाले असताना केसरकर वाढदिवस साजरा कसा करतात;डॉ परुळेकर यांची टीका ⚡सावंतवाडी ता.१९-: काल इंदोर जवळ महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या इंदोर अंमळनेर बसला भीषण अपघात झाला आणि एसटी बस नदीत कोसळून १२ जण ठार झाले.राज्यात लाखो लोक बस ने प्रवास करीत असून ही दुःखद घटना आहे.शोकाकुल वातावरण असताना साळसूद पणाचा आणि सु संस्कृत…

Read More

किर्लोस येथे कृषीकन्यानी केले चारसुत्री भात लागवडीचे मार्गदर्शन

ओरोस ता.१९-: गिरिपुष्प झाडांची पाने चिखलणीपूर्वी वापरून चारसुत्री भात रोपांची लागवड करण्याचे प्रात्यक्षिक किर्लोस येथील प्रदीप सावंत यांच्या शेतात कृषीकन्यानी दाखविले.येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस या महाविद्यालयाच्या कृषी कन्या किर्लोस येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या आहेत. येथील प्रदीप सावंत यांच्या शेतात शेतकऱ्यांना चारसुत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच यासाठी चिखल करण्यापूर्वी गिरिपुष्प झाडाची…

Read More

१३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत

ओरोस ता.19-: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी आदेशित केल्यानुसार १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय व सर्व तालुका दिवाणी न्यायालयात करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी प्राधिकरण सचिव डी बी म्हालटकर यांनी दिली आहे.जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश तर तालुका…

Read More

विविध मागण्यांसाठी २२ जुलै रोजी ग्रामीण डाक सेवकांचे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता १९ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून घ्यावे त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांकडे डाक विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संघटनेच्यावतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून २२ जुलै रोजी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय…

Read More

११ ऑगस्ट रोजी मालवणात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

जिल्ह्यातील महिलांना होता येणार सहभागी;यतीन व शिल्पा खोत मित्र मंडळाचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील यतीन खोत मित्रमंडळ व सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ यांच्या वतीने मालवण मधील नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त दि. ११ ऑगस्ट रोजी महिलांसाठी जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहितीसामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी दिली ऐतिहासिक मालवण शहराने नारळी पौर्णिमेला नारळ…

Read More
You cannot copy content of this page