किर्लोस येथे कृषीकन्यानी केले चारसुत्री भात लागवडीचे मार्गदर्शन

ओरोस ता.१९-:

गिरिपुष्प झाडांची पाने चिखलणीपूर्वी वापरून चारसुत्री भात रोपांची लागवड करण्याचे प्रात्यक्षिक किर्लोस येथील प्रदीप सावंत यांच्या शेतात कृषीकन्यानी दाखविले.
येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस या महाविद्यालयाच्या कृषी कन्या किर्लोस येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या आहेत. येथील प्रदीप सावंत यांच्या शेतात शेतकऱ्यांना चारसुत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच यासाठी चिखल करण्यापूर्वी गिरिपुष्प झाडाची पाने टाकून नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन केले. आनंदी व समृद्ध गाव योजनेचे जनक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतील नैसर्गिक शेती याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी कृषी कन्या नूतन झगडे, प्राची कसालकर, समीक्षा तिरोडकर यांनी हे मार्गदर्शन केले. यासाठी त्यांना प्राचार्य श्रीमती एस पी सामंत, कार्यक्रम समन्वयक एन ए साईल, प्रा डॉ एल. एस व्यवहारे, डॉ पी जे खोसे, जी डी गायकी यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page