Headlines

श्री गणेश चतुर्थीपूर्वी वेंगुर्ला तालुक्यातील कामे मार्गी लावा : श्री. शंकर घारे

वेंगुर्ला
आगामी श्री गणेशोत्सव व अन्य सणाच्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेला चांगली सुविधा मिळणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग – बांधकान विभाग – विद्युत वितरण विभाग
व अन्य विभाग यांनी तत्परतेने सेवा पुरवून नागरिकांना चांगल्या व परिपूर्ण सुविधा मिळण्याच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी करून उर्वरित मेंटेनन्स कामे पूर्ण करण्याचे आदेश वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांनी उपस्थित सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना आज (12 ऑगस्ट) रोजी झालेल्या पं. स. मासिक सभेत दिले. वेंगुर्ला पंचायत समितीची सर्वसाधारण मासिक सभा आज परुळेबाजार ग्रामपंचायत सभागृहात सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, म्हापण
पं. स. सदस्य विष्णु फणसेकर, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, उभादांडा पं. स. सदस्य साक्षी नार्वेकर, वायंगणी पं. स. सदस्य
शितल राऊत, तुळस पं. स. सदस्य सुचिता वजराटकर, रेडी पं. स. सदस्य प्रियांका घाटवळ, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी व अन्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते. तसेच परुळेबाजार ग्रामपंचायत सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच प्रतीक्षा पाटकर आदी उपस्थित होते. या सभेत सभापती, उपसभापती, पं. समिती सदस्य यांचा परुळेबाजार ग्रामपंचायतच्या वतीने शाल, श्रीफळ व बचतगटमार्फत बनविण्यात आलेल्या श्रीगणेश मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या सभेत सर्वच सदस्यांनी सूचना मांडल्या. यावेळी वेंगुर्ला पंचायत समितीचे सर्वप्रथम सभापती पुरुषोत्तम देसाई यांचे नातू सचिन देसाई हे विद्यमान उपसभापतीपद भूषवीत असल्याने सचिन देसाई यांच्या अभिनंदनाचा ठराव सभापती शंकर घारे यांनी मांडला. अन्य सदस्यांनी विविध ठराव मांडले. कोकण विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अभिनंदनाचा व अन्य अभिनंदन ठराव मांडण्यात आले. वीज वितरणला सभेत स्मार्ट मीटर व अन्य कार्यपद्धतीबाबत सूचना देण्यात आल्या.
दरम्यान उभादांडा येथील अतिक्रमण बाबत 3 सभामध्ये सूचना मांडूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने उभादांडा पं. स. सदस्य| साक्षी नार्वेकर यांनी याबाबत त्वरित दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page