इंदोर अपघातात नागरिक मृत झाले असताना केसरकर वाढदिवस साजरा कसा करतात;डॉ परुळेकर यांची टीका
⚡सावंतवाडी ता.१९-: काल इंदोर जवळ महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या इंदोर अंमळनेर बसला भीषण अपघात झाला आणि एसटी बस नदीत कोसळून १२ जण ठार झाले.राज्यात लाखो लोक बस ने प्रवास करीत असून ही दुःखद घटना आहे.शोकाकुल वातावरण असताना साळसूद पणाचा आणि सु संस्कृत पणा चा आव आणणाऱ्या आणि मीडिया समोर वक्तव्य करणाऱ्या केसरकर यांना मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची गरज होती.मात्र हिंदुत्वाचे कारण पुढे करून फुटीर वादी गटाचे प्रवक्ते झालेल्या मंत्री पदासाठी आसुसलेले केसरकर वाढदिवस कसला साजरा करीत आहेत असा सवाल डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
