१३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत

ओरोस ता.19-:

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी आदेशित केल्यानुसार १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय व सर्व तालुका दिवाणी न्यायालयात करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी प्राधिकरण सचिव डी बी म्हालटकर यांनी दिली आहे.
जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश तर तालुका न्यायालयात दिवाणी न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. त्या त्या न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे पक्षकारांच्या सहमतीने ठेवून सामंजस्याने व तडजोडीने मिटविली जाणार आहेत. सकाळी १०.३० वाजता ही लोक अदालत सुरू होणार आहे. प्रलंबित असलेली तडजोडपात्र फौजदारी, दिवाणी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई, भूसंपादन प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवावी, असे आवाहन सचिव म्हालटकर यांनी केले आहे.
लोक अदालतीमध्ये केलेल्या तडजोडीमुळे प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. या न्यायाविरोधात अपील करता येत नाही. या निवाड्याची अंमल बजावणी न्यायालया मार्फत होते. तसेच कोर्ट फी परतावा रक्कम दाखल करणाऱ्यास परत मिळतो. यासाठी अधिक माहिती करिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ८५९१९०३६०७ या भ्रमणध्वनिशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव म्हालटकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page