Headlines

ड्रीम स्क्वेअर आणि सिद्धिविनायक कॉलनी सांगिर्डेवाडीत नवरात्र उत्सव

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : नवरात्रोत्सव कार्यक्रम २०२६ अंतर्गत युवा उद्योजक संतोष वालावलकर कुटुंबीय पुरस्कृत ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी व सिद्धिविनायक कॉलनी याच्या सहकार्याने नवरात्र सोहळ्यानिमित्त विविध स्पर्धा धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन 11ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी बजाज शोरूमच्या मागे सांगिर्डेवाडी कुडाळ येथे करण्यात आले आहे
  आज सकाळी धार्मिक विधीने यांना नवरात्र सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली सकाळी ८.०० वाजता श्री एकादशमी अभिषेक कथावाचन व गरबा रास हा कार्यक्रम झाला उद्या सोमवार १२रोजी रात्री ९ वाजता -ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी व सिद्धिविनायक कॉलनीतील महिलांचे नृत्य त्यानंतर – गरबा रास मंगळवार, १३ रोजी रात्री ८.०० वाजता -श्री देव जैन महालक्ष्मी फुगडी ग्रुप, वालावल घाडीवाडी यांचा फुगडी कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता – गरबा रास
बुधवार, १४ रोजी रात्री ८.०० वाजता लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स रात्री ९.३० वाजता – गरबा रास, गुरुवार, १५ रोजी रात्री ८.०० वाजता – मान्यवरांची उपस्थिती व स्वागत रात्री ८.३० वाजता हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम गायक युसुफ आणि गायिका सपना लहान मुलांचे खेळ व सिंधुकन्या जादूगार पूर्वा यांचा जादूचा खेळ, रात्री १०.०० वाजता गरबा रास शुक्रवार, १६ रोजी रात्री ८.०० वाजता  लहान मुलांची व महिलांची वेशभूषा स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा विषय – पाणी आणि पर्यावरण रात्री १०.०० वाजता – गरबा रास. शनिवार, १७ रोजी रात्री ८.०० वाजता लहान मुलांसाठी मनोरंजक खेळ, रात्री ९.३० वाजता – गरबा रास. रविवार, १८ रोजी रात्री ८.०० वाजता – खेळ पैठणीचा निवेदक युसुफ आवटी, हिंदी-मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम गायक युसुफ आणि गायिका सपना.
१९ रोजी रात्री ९.०० वाजता – गरबा रास. २० रोजी विजयादशमी सोन वाटप, रात्री ९.०० वाजता – गरबा रास आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सभासदांनी व सहकाऱ्यांनी सर्व कार्यक्रमांना  उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page