मालवण (प्रतिनिधी)

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवणच्या अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी अक्षया मांजरेकर हिने १९ वर्षाखालील मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे तिची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अक्षया मांजरेकर हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे पदाधिकारी, प्राचार्य आर डी बनसोडे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
