विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

मालवण : (प्रतिनिधी)
क्रीडा व युवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदूर्ग, व मालवण क्रीडा समिती ,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील टोपीवाला हायस्कुल येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवणच्या संघाने १९ वर्षाखालील गटात उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकाविले. या कामगिरीमुळे या संघाची विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या संघासाठी मार्गदर्शक म्हणून म्हणून प्रा. गुरूदास दळवी व प्रा. स्नेहल पराडकर यांनी तर व्यवस्थापक म्हणून प्रा. पवन बांदेकर यांनी काम पाहिले. या यशाबद्दल भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे पदाधिकारी, प्राचार्य आर डी बनसोडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे
