Headlines

राष्ट्रीय हिंदी परीक्षेत वराडकर हायस्कूल कट्टाचे सुयश

मालवण दि प्रतिनिधी

महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था या तर्फे अखिल भारतीय राजभाषा हिंदी ओलंपियाड परीक्षेत मधुर अर्जुन पेंडुरकर व ऋतुजा सुहास परब या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व मेडल असे सन्मानाचे स्वरूप असून प्रशालेतील एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र व मेडल यांनी सन्मानित करण्यात आले .

याबरोबरच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा या प्रशालेस आदर्श प्रशाला , सौ.देवयानी धनंजय गावडे यांना आदर्श मुख्याध्यापिका, तसेच श्री बाळकृष्ण मल्लाप्पा वाजंत्री यांना परीक्षा आयोजक त्याचप्रमाणे आदर्श हिंदी अध्यापक म्हणून सौ.सिमरन समीर चांदरकर, श्री.भूषण विकास गावडे, श्री.रितेश तुकाराम जांभवडेकर यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले .

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, संस्था पदाधिकारी ,मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. महेश भाट ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page