Headlines

मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

१४, १७ व १९ वर्षांखालील विजयी संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मालवण : (प्रतिनिधी)

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेचे उद्घाटन मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जी. व्ही. सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी कुस्ती क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे, पर्यवेक्षक देविदास वेरलकर, प्रफुल्ल सामंत, निशाकांत पराडकर, अन्वेषा कदम, राजेश आजगावकर, अमेय बादेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटांत चुरशीचे सामने रंगले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- १४ वर्षांखालील मुले : प्रथम : टोपीवाला हायस्कूल, मालवण, द्वितीय : नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली, तृतीय : जयगणेश इंग्लिश मि. स्कूल, मालवण. १४ वर्षांखालील मुली : प्रथम : जय गणेश इंग्लिश मि. स्कूल, मालवण, द्वितीय : सेंट उर्सुला इंग्लिश मि. स्कूल, कणकवली, तृतीय : मिलाग्रीस ई. मि. स्कूल, सावंतवाडी. १७ वर्षांखालील मुले : प्रथम : जय गणेश इंग्लिश मि. स्कूल, मालवण, द्वितीय : नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली, तृतीय : मिलाग्रीस इंग्लिश मि. स्कूल, सावंतवाडी. १७ वर्षांखालील मुली : प्रथम : जयगणेश ई. मि. स्कूल, मालवण, द्वितीय : मिलाग्रीस इंग्लिश मि. स्कूल, सावंतवाडी, तृतीय : सेंट उर्सुला इंग्लिश मि. स्कूल, कणकवली. १९ वर्षांखालील मुले : प्रथम : भंडारी ए. सो. ज्युनियर कॉलेज, मालवण, द्वितीय : टोपीवाला ज्युनियर कॉलेज, मालवण, तृतीय : डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज, ओरोस, १९ वर्षांखालील मुली : प्रथम : टोपीवाला ज्युनियर कॉलेज, मालवण, द्वितीय : रामभाऊ परुळेकर ज्युनियर कॉलेज, मालवण, तृतीय : रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण.

या स्पर्धेमधील विजेते मुला-मुलींचे संघ दि. १३, १४ व १५ ऑक्टोबर रोजी वारणानगर येथे होणाऱ्या विभागीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेसाठी अजय शिंदे, निशाकांत पराडकर, अभिजीत खानोलकर, कॅलिस फर्नांडिस, विनायक चव्हाण, जेरी फर्नांडिस, प्रसाद चव्हाण, दिनेश चव्हाण, किरण राठोड, अमेय बादेकर, पी. एम्. सामंत, मेघश्याम लाड, ⁠गणेश चोपडेकर, प्रल्हाद नाईक यांनी पंच व सामनाधिकारी म्हणून काम पाहिले.

विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अण्णासाहेब सकपाळ, कार्याध्यक्ष विजय मागाडे, जिल्हा क्रीडाअधिकारी मार्क धरमाई यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page