विविध मागण्यांसाठी २२ जुलै रोजी ग्रामीण डाक सेवकांचे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता १९
ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून घ्यावे त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांकडे डाक विभागाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संघटनेच्यावतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून २२ जुलै रोजी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्गचे सचिव कॉ. तुकाराम गावडे यांनी दिली.
ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून घ्यावे, त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, डाक सेवेचे खाजगीकरण थांबवावे, जी डी एस कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, पदोन्नती देण्यात यावी, बंचिंग आदेश लागू करण्यात यावा, समूह विमा रक्कम ५० हजार ऐवजी ५ लाख करण्यात यावी या मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संघटनेच्यावतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येणार आहे. यात २२ जुलै रोजी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन, २५ ऑगस्ट रोजी मंडळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन व रॅली, २ सप्टेंबर रोजी डाक भवन येथे एक दिवसीय उपोषण, त्यांनतर सप्टेंबर मध्येच दोन दिवसांचा संप करण्यात येणार आहे. तसेच संप करूनही मागण्यांबाबत काही न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही संघटनेचे सचिव कॉ. तुकाराम गावडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page