११ ऑगस्ट रोजी मालवणात महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

जिल्ह्यातील महिलांना होता येणार सहभागी;यतीन व शिल्पा खोत मित्र मंडळाचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील यतीन खोत मित्रमंडळ व सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ यांच्या वतीने मालवण मधील नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त दि. ११ ऑगस्ट रोजी महिलांसाठी जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती
सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी दिली

ऐतिहासिक मालवण शहराने नारळी पौर्णिमेला नारळ लढविण्याचा पारंपारिक खेळ आजही जपलेला आहे. याच अनुषंगाने पुरुषप्रधान असणाऱ्या या खेळात महिलांनाही संधी व व्यासपीठ मिळावे म्हणून शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळातर्फे गेली काही वर्षे खास महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा घेण्यात येत आहे. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे ही स्पर्धा घेण्यात आली नाही. मात्र यावर्षी ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात मालवण बंदर जेटी येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेला सिने कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धकांना आयोजकांकडून नारळ पुरविण्यात येणार आहेत. प्रथम विजेत्या महिलेस सोन्याचा नारळ व पैठणी, द्वितीय विजेत्यास सोन्याची नथ, तृतीय विजेत्यास चांदीची वस्तू व इतर विशेष पारितोषिके देण्यात हेणारे आहेत. ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत शिल्पा खोत- मोबा ९३२६४७७७०७, सायली कांबळी – मोबा ९७६४३९७१३९, कल्पिता जोशी – मोबा ९४०४९४०९२४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सौ. शिल्पा खोत यांनी केले

You cannot copy content of this page