Headlines

सिंधुदुर्ग महाविद्यालयात १४ रोजी सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागामार्फत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सन्मान देशभक्तांचा आणि मशाल फेरी – तिरंगा रॅली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १४ रोजी सायंकाळी ५ वाजता सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सभागृहात सन्मान देशभक्तांचा हा कार्यक्रम होऊन त्यामध्ये सध्याचे आर्मी ऑफिसर यांचा सत्कार होणार आहे. तर सायंकाळी ६. ३० वाजल्यानंतर मालवण शहरातून मशाल फेरी व तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. तरी मालवण शहर व तालुक्यातील शहरातील सर्व शाळा, कॉलेजे, विद्यार्थी, शिक्षक, सर्व पदाधिकारी, विविध संस्था पदाधिकारी व नागरिक यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य कैलास राबते आणि एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page