Headlines

मालवणच्या भंडारी प्राथमिक शाळेच्या आरोही शिंदे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

⚡मालवण ता.१२-:
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचालित भंडारी ए.सो. प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी कु.आरोही सतिश शिंदे हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत मालवण तालुक्यात शहरी विभागात पाचवा क्रमांक पटकाविला आहे

आरोही हिच्या यशाबद्दल भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, संस्थेचे चेअरमन श्री सुधीर हेरेकर हायस्कुलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी तसेच संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page