सावंतवाडी ब्राह्मण मंडळतर्फे गुणवंतांचा सत्कार

⚡सावंतवाडी ता.१९-: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी ब्राह्मण मंडळ कडून 10वी,12वी ग्रॅज्युएट स्कॉलरशिप मुलांचा महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित गुणगौरव कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.एकूण 23 मुलांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ मृदुला महाबळ अंबापुरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी डॉ.महाबळ अंबापुरकर यांनी उपस्थित मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा मंडळ अध्यक्ष राजाराम चिपळूणकर,बांदेकर फाईन आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य धोपेश्वर, तालुका अध्यक्ष प्रसाद मराठे, तालुका मंडळाचे उपाध्यक्ष विश्वेश्वर कोळंबेकर,तालुका कार्यवाह सौ अंजली नातू,शिक्षण समिती प्रमुख शिवानंद भिडे व सदस्य तसेच ज्ञाती
बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page