माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी
⚡मालवण ता.१९-: मालवण पोष्ट ऑफिस समोरील मेकॅनिकल रोड येथे सतत साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने या ठिकाणी गटार खोदाई करून त्यावर लाद्या टाकण्याची मागणी मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे
मालवण शहरातील मेकॅनिकल रोड येथील साचलेल्या पाणी परिसराची भाजप पदाधिकारी यांनी नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, राजू बिडये यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
