Headlines

वेंगुर्ल्यात १३ ऑक्टोबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर..

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य: आमदार प्रमोद जठार व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती..

⚡वेंगुर्ला, ता. १२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा समर्पण अभियान-२०२६’ अंतर्गत, तसेच पालकमंत्री नितेश राणे आणि भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांना विविध आरोग्यविषयक तपासण्या व आवश्यक उपचारांचा लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या सेवाभावी उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन भाजप सिंधुदुर्ग, वेंगुर्ला प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले असून, आरोग्यदूत म्हणून भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

You cannot copy content of this page