स्ट्रीट फूड वेंडरचे प्रशिक्षण घेतलेल्याना मिळणार कर्ज

कौशल्य विकास प्रधान सचिव मनीषा शर्मा यांनी दिला शब्द

⚡सावंतवाडी ता.१९-: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्ट्रीट फूड वेंडर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचे प्रस्ताव तयार करा, त्यांना कर्ज उपलब्ध करून देवू असा शब्द कौशल्य विकास केंद्राच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिला आहे.दरम्यान येथील एस. एस. आय कम्प्युटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या केंद्रात विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या प्रशिक्षण दिले जात आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी काढले. या ठिकाणी “स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण घेतलेल्या ६० विद्यार्थ्यांना आज प्रणाम पत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी “त्या” बोलत होत्या.

यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कौशल्य विकास सिंधुदुर्गचे नामदेव सावंत, एस. एस. आय. कम्प्युटरचे प्रमुख रघुनाथ तानावडे, संकेत गावडे, मंदार परब, चिन्मई केळबाईकर, सुखदा नाईक, कविता नाईक, प्रतीक्षा कांबळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी वर्मा पुढे म्हणाल्या, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण दिली जात आहेत. यात विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी “स्ट्रीट फूड वेंडर” चे प्रशिक्षण दिले जाते. येथील एस. एस. आय कम्प्युटरच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आपण या ठिकाणी घेतला आहात. आता त्याचा उपयोग प्रत्येकाला रोजगार निर्माण करण्यासाठी करायचा आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या चार- चार मुलांनी एकत्र येऊन उद्योग सुरू करावेत, त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आमच्याकडे सादर केल्यास आम्ही कर्जपुरवठा करू, असा शब्द त्यांनी दिला.

You cannot copy content of this page