कुडाळ ता.१९-:
आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्ग आणि महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व बाहूस्त्रोत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी बूस्टर डोस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी एकूण 465 जणांना बूस्टर डोस चे लसीकरण करण्यात आले आहे.
महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी उन्हाळा,पावसाळा व आपत्कालीन परिस्थितीत सुध्दा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक मेहनत घेतात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नायर साहेब यांनी सदर बाब लक्षात घेऊन बूस्टर डोस लसीकरण शिबिर आयोजनाकरिता पुढाकार घेतलेला होता.
महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री विनोद पाटील यांनी सदर आयोजनाबद्दल व सहकार्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर साहेब तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व कर्मचारी यांचे आभार मानले.
