Headlines

मसुरे चांदेरवाडीत जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचे श्रमदानातून वनराई बंधारा

मालवण दि प्रतिनिधी

मसुरे येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील कर्मचारी आणि चांदेरवाडीतील ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून श्रमदानाद्वारे वनराई बंधारा बांधण्यात आला.

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठा उपलब्ध होण्यास मदत करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या उपक्रमात मसुरे शाखाधिकारी येसूबाई कांदळगावकर आणि लिपिक रवींद्र मोहिते यांनी सहभाग घेतला. तसेच बँक सखी रोही गावकर, पोलीस पाटील सोनल भोगले, आशा सेविका शुभांगी मुळीक, मदतनीस भाग्यश्री आंगणे यांच्यासह संतोष भोगले, सर्वेश भोगले, मनीष भोगले, सुधा भोगले, गुरुप्रसाद भोगले, प्रसाद भोगले, आनंद भोगले, शिवप्रसाद भोगले, सृष्टी लाड, वेदिका भोगले, आराध्या भोगले आणि सोहम बागवे आदी ग्रामस्थांनी श्रमदान केले.
बँक कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत जलसंधारणाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page