आंबोली ता.२०-:आंबोली नागरतास येथे झालेल्या दुचाकी आणि चारचाकी गाडीच्या अपघातात आंबोली सिंधुदुर्ग बँकेचे कर्मचारी निशिकांत बांगडी (वय ४२ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चौकुळ शाखेचे व्यवस्थापक संतोष शिंदे ( वय ३५ वर्ष) यांचे दोन्ही पाय जायबंदी झाले असून, ते गंभीर जख्मी आहेत. आंबोली येथील प्राथमिक केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला असून, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आंबोली येथील अपघातात सिंधुदुर्ग बँक कर्मचारी ठार,व्यवस्थापक जायबंदी.
