Headlines

मोती तलावात लवकरच बोटिंग सुरू होणार..

सिंधुरत्नमधील शिल्लक ७५ लाखांतून नव्या बोटी खरेदी करण्याचा निर्णय: सभापती मोहिनी मडगावकर यांची माहिती

⚡सावंतवाडी, ता. १०-: सिंधुरत्न योजनेतून प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून यापूर्वी २५ लाख रुपये खर्च करून बोट खरेदी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या काळात काही कारणांमुळे बोटिंग सेवा बंद राहिली. आता शिल्लक असलेल्या ७५ लाख रुपयांच्या निधीतून आवश्यक त्या नव्या बोटी खरेदी करून सावंतवाडीतील मोती तलावात लवकरात लवकर बोटिंग सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन व उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी नगरपरिषदेच्या सभेत दिली.

मोती तलावाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बोटिंग सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी उपलब्ध निधीचा योग्य वापर करून आवश्यक बोटी खरेदी करण्यात येणार असून, त्यानंतर मोती तलावात पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.बोटिंग सेवा सुरू झाल्यास मोती तलावाच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्यासह सावंतवाडीच्या पर्यटन क्षेत्रालाही त्याचा फायदा होणार आहे.

You cannot copy content of this page