Global Maharashtra Breaking News

तारकर्लीमध्ये एमटीडीसीच्या आवारात अद्ययावत प्राथमिक उपचार केंद्र उभारावे

चंद्रशेखर उपरकर यांची मागणी कणकवली ता.२४-:* मालवणमधील तारकर्ली-देवबाग मध्ये पर्यटकांची वाढती गर्दी आणि समुद्रातील आकस्मिक घटनांवर पर्यटकाना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून तारकर्ली येथील एमटीडीसी च्या जागेमध्ये राज्य सरकारने अद्ययावत असे प्राथमिक उपचार केंद्र निर्माण क्ररावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन संस्था फेडेरशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यानी केली आहे. तारकर्ली येथे नुकत्याच घडलेल्या स्कूबा डायव्हीगच्या बोट…

Read More

जिल्ह्यातील ६९७ गावे कोरोना मुक्त

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ संदेश कांबळे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता २४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ७४१ महसूल गावांपैकी सद्यस्थितीत ६९७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर अद्यापही जिल्ह्यात सहा रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा अद्यापही कोरोनामुक्त झालेला नाही. जिल्ह्यातील एकूण ७४१ गावांपैकी ३८ गावामध्ये एकही कोरोना रुग्ण…

Read More

साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

पावसाळी नियोजन पूर्ण;जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता.२४ पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून साथरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज ठेवण्यात आला आहे. आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करून आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे…

Read More

ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज घालताना भडका उडून वायरमन जख्मी…

बांदा ता.२४-:* सातोसेत ट्रान्स्फॉर्मरमध्ये फ्युज घालत असताना भडका उडाल्याने वायरमन जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यात वायरमन श्री. सबकाळे यांच्या हातासह चेहर्‍यावर आगीचा लोळ उडाला. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. सातोसेतील ट्रान्स्फॉर्मर प्रमाणे मडुरे परबवाडी व माऊली मंदिर नजीकचा…

Read More

राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर बाविसावा

सावंतवाडी ता.२४-:* कर्नाटकमधील मेंगलोर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई अॅकेडमीचा राष्ट्रीय खेळाडु बाळकृष्ण पेडणेकर याने मुख्य गटात बाविसावा क्रमांक मिळवला.बाळकृष्णला रोख बक्षिस,ट्राॅफी आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. दक्षिण कर्नाटक बुदधिबळ असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत पंधरा राज्यातील तब्बल तीनशे अठरा खेळाडुंचा सहभाग होता.विशेष म्हणजे पारीतोषिकप्राप्त स्पर्धकांमध्ये बाळकृष्ण हा महाराष्ट्रातील एकमेव…

Read More

सिंधुदुर्ग विमानतळाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

समस्या अजूनही कायम; मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी गैरसोयींकडे वेधले लक्ष कणकवली ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ पूर्णत्वास आले मात्र सहा महिने होत आले तरीही विमानतळावरील गैरसोयींकडे दुर्लक्षच केले जात आहे.ना खासदारांचे लक्ष आहे ना आमदारांचे. तसेच इतर लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळाच करत आहेत. केवळ उद्घाटनापुरताच यांचा विमानतळाशी संबंध होता, अशी टीका मनसे सरचिटणीस परशराम उपरकर यांनी…

Read More

कळसुली हायस्कूलच्या १९९०-९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

कणकवली ता.२४-:* कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली या प्रशालेत सन १९९०/९१ च्या एस.एस.सी.बॅचचा स्नेहमेळावा माजी जि.प. अध्यक्ष आर.बी.दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व एन. व्ही. कुलकर्णी विद्यालय पांग्रड माजी मुख्याध्यापक एस.बी. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कळसुली शिक्षण संघ मुंबईचे अध्यक्ष श्रीधर वि….

Read More

उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ आणि एस्करे टेक्निशियन यांची नेमणूक करा…

नगरसेवक अभिषेक गावडे यांची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ उपजिल्हा रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व एक्सरे टेक्नीशियन नेमा, अशी मागणी भाजप नगरसेवक अभिषेक गावडे आणि भाजप शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यात 72 खेडेगाव आहेत आणि कुडाळ शहर मध्यवर्ती ठिकाण असून येथे उपजिल्हा रूग्णालय…

Read More

उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार प्राप्त जयंत जावडेकर यांचा आमदार दीपक केसरकर यांनी केला सत्कार…

सावंतवाडी ता.२४-:* नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना क वर्ग नगरपरिषद गटातून उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच अनुषंगाने आज आमदार दीपक केसरकर यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. यावेळी राजन पोकळे, अनारोजीन लोबो, कुडपकर आदी उपस्थित होते.

Read More

दागिने सफाई करणाऱ्या संशयितास पाडलोस ग्रामस्थांनी पकडले

एक जण पळाला : सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन बांदा ता.२४-:* पाडलोस-केणीवाडा येथे एकाच वेळी तीनवेळा दागिने सफाई करण्याच्या बहाण्याने फेऱ्या मारणाऱ्या बिहार येथील जुलफान अली नामक संशयिताला सतर्क ग्रामस्थांनी पकडले. तर त्याचा दुसरा मन्सूर नामक सवंगडी पळून जाण्यात यशस्वी झाला. बांदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या संशयिताला ताब्यात घेतले. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहे. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page