सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.१३-: :सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘ चित्रकला स्पर्धा ‘ व प्रभातफेरी हे कार्यक्रम शनिवार दिनांक १३.०८.२०२२ रोजी आयोजित करण्यात आले . चित्रकला स्पर्धेत इ. १ली ते १०वी तील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा ‘ या विषयातंर्गत आकर्षक चित्र रेखाटन केले . त्यानंतर प्रशालेतून इ .८वी ते १० वी विद्यार्थ्यांची शाळेजवळील बाहेरचावाडा , माठेवाडा व वैश्यवाडा परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली . यावेळी विद्यार्थ्यांनी ‘ हर घर तिरंगा ‘ या विषयावर जोरदार घोषणा दिल्या. तर विद्यार्थ्यांनी सुरेल देशभक्तीपर गीत गायन केले.या कार्यक्रमांना सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी शाळेत उपस्थित होते . या कार्यक्रमांना सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

You cannot copy content of this page