पोलीस, ग्रामपंचायत, व्यापारी संघाची होणार संयुक्त बैठक
बांदा /प्रतिनिधी
गणेश चतुर्थीचे वाहतूक व बाजारपेठेचे नियोजन करण्यासाठी पोलीस, ग्रामपंचायत प्रशासन व व्यापारी संघ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन शुक्रवार दिनांक १९ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी बांदा शहरात गणेश चतुर्थीपूर्वी नियोजन करण्यात येते. बांदा बाजारपेठ ही आजूबाजूच्या ३५ ते ४० गावांची बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे शहरातील सर्व व्यापारी बांधव यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
