स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा करा

कणकवली तहसिलदार आर. जे. पवार यांचे आवाहन

⚡कणकवली ता.१३-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रत्येक घरावर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकविण्यात येत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या ठिकाणीही तीन दिवस ध्वजारोहण होणार आहे. मात्र, त्याचबरोबरीने दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ मि. तालुकास्तरीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम येथील तहसीलदार कार्यालयाच्पा ठिकाणी होणार असून तालुक्यातील सर्व जनतेने यात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार आर. जे. पवार यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त आतापर्यंत विविध शोभायात्रा, चित्ररथ, शालेय विद्यार्थ्याच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, नागरीक यात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तहसीलदार कार्यालय परिसराची स्वच्छता, साफसफाई, विविध वृक्ष लागवड, सुशोभीकरण, विद्युत रोषणाई आदी उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम ७५ फूट उंचीचा ध्वज उभारण्याचा बहुमानही कणकवली तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयाने मिळवीला आहे. तसेच लाल किल्ल्याची प्रतिकृतीही तयार करण्यात आली आहे. ७५ फूट उंचीच्या ध्वजाच्या ठिकाणीही सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या आवाहनानुसार दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक परावर तिरंगा फडकविण्यात आला आहे. शासकीय कार्यालयांच्या ठिकाणीही तीन दिवस स्वजारोहण करण्यात येत आहे. प्रत्येकाने ध्वजसंहितेचे पालन करून अमृत महोत्सव साजरा करावा. तसेच तालुक्यातील सर्व नागरीकांनी यात सहभागी व्हावे. दि. १५ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. तहसीलदार कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ७५ फूट ध्वजस्तंभाच्याठिकाणी हे ध्वजारोहण होणार असून सर्व नागरीकांनी यात सहभागी व्हावे. या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page