वायरी केळबाई मंदिरात १६ ला संयुक्त दशावतार

मालवण दि प्रतिनिधी

मालवण वायरी येथील केळबाई मंदिरात श्रावणी मंगळवार व सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने दि १६ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता संयुक्त दशावतार कंपनीचा ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

नाट्यप्रयोगात बलराम (मास्टर) दादा राणे – कोनसकर, कृष्ण-उदय राणे-कोनसकर, यक्ष-प्रशांत मयेकर, नारद-सागर हनपाडे, रुक्मिणी-बंटी कांबळी, शेतकरी- सुहास गावडे, सत्यभामा-संजय लाड, सखू -श्रीराम ताहील, शिवगण-गौरेश मेस्त्री यांच्या भूमिका आहेत. हार्मोनियम-मयुर गवळी, पखवाज- चंद्रकांत खोत, झांज – राजू कलिंगण यांची संगीत साथ आहे.

You cannot copy content of this page