नगरपालिका, मत्स्य विभागाचा संयुक्त उपक्रम
मालवण दि प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालवण नगरपालिका आणि मस्य व्यवसाय उपविभाग मालवणच्यावतीने मालवण बंदर जेटी समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत प्लास्टिक बॉटल्स, पिशव्या, प्लास्टिक बॉटल्सूची झाकणे, दारूच्या बाटल्या, खराब झालेली जाळी, चप्पल आदी कचरा मोठ्या स्वरुपात गोळा करण्यात आला. मोहिमेत शहर स्वच्छता समन्वयक निखील नाईक, आरोग्य निरीक्षक प्रसाद भुते, मुख्य लिपीक महेश परब यांच्यासह नगरपालिका कर्मचारी तसेच सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांच्यासह मत्स्य विभागाचे कर्मचारी, सागर सुरक्षारक्षक टीम, झालझुल दांडी मित्रमंडळ, यूथ बिट्स फॉर क्लायमेटचे सदस्य आणि स्वच्छताप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
