मालवण दि प्रतिनिधी
क्रांतिदिनाचे औचित्य साधून येथील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला २७ रक्तदात्यांनी रक्तदान करून उस्फुर्त प्रतिसाद दिला . या शिबिराला महिला रक्तद्रात्यांनीही रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मालवणचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते झाले . यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, तहसीलदार अजय पाटणे, आस्था ग्रुपचे सचिव मनोज चव्हाण, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अनिकेत फाटक, महेश जावकर, महेश परब यांच्यासह जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
