Headlines

अधीक्षकांच्या पत्नीच्या हस्ते झाले पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन

पोलीस वसाहतीत पोलीस कल्याण निधीतून तीन हजार लिटरची बसविण्यात आलीय टाकी

मालवण दि प्रतिनिधी
मालवण पोलीस वसाहत येथे २४ तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने पोलीस कल्याण निधीतून बसवण्यात आलेल्या ३ हजार लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन सौ. समिक्षा राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

मालवण पोलीस ठाणे वसाहत समुद्र किनारी असल्यामुळे पाण्याचा प्रश्न याठिकाणी असल्याने मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र विहिरीतून पाणीपुरवठा होतो. मात्र एप्रिल मे महिन्यात याठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. काही महिन्यांपूर्वी सौ. समिक्षा दाभाडे यांनी मालवण पोलीस वसाहत याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी वसाहत येथे २४ तास पाणीपुरवठा होत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. पोलिस वसाहतीत २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे ही बाब त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीस कल्याण निधीतून तत्कालीन पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर व सार्वजनिक बांधकाम मालवण अभियंता नितीन दाणे यांच्या माध्यमातून पोलीस वसाहत येथे पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्याचे नियोजन केले. या
टाकीत धामापूर नळपाणी योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे , मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, तत्कालीन पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

फोटो :
मालवण पोलीस वसाहत येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन सौ. समिक्षा राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे, विजय यादव,एस एस ओटवणेकर, प्रतिज्ञा खोत

You cannot copy content of this page