आम. नितेश राणे यांच्या सूचनेनंतर कार्यवाही
⚡कणकवली ता.१३-: कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्विस रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित केल्यानंतर सर्विस रोडवरील पुतळ्या ठिकाणची जागा डांबरीकरण न करता बॅरिगेट्स लावून ठेवण्यात आली होती. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. ही बाब आम. नितेश राणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना तात्काळ सदर भागाचे डांबरीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आज दुपारपासून सदरचा भाग डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित झाल्यानंतर जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटत आला आहे. पुतळा स्थलांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणची जागा सुस्थितीत करण्याबाबत कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काल आम.नितेश राणे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली होती . नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आम.नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते.आज आम.नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरणला हा भाग तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर रस्ता दुरुस्तीस सुरुवात झाली.त्यामुळे मोठी गैरसोय दूर होणार आहे.
