⚡कणकवली ता.१३-: भारतीय स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला रविवार १४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प.पू. आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे अखंड भारत दिनानिमित्त राष्ट्र सेविका समिति शाखा कणकवली तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यात दीपप्रज्वलन, भारतमाता पूजन, देशभक्तीपर गीतगायन, घोषणा व विद्याभारतीचे सिंधुदुर्ग जिल्हा सहसचिव विवेक मुतालिक यांचे ” स्वतंत्र भारताची अमृत महोत्सवी वर्षातील बहुआयामी प्रगती ” यावर विचार ऐकायला मिळणार आहेत.
तरी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सर्व भारतीय नागरीक मंच कणकवलीच्यावतीने करण्यात आले आहे.
