भारत-नेपाळ हिंदी शिक्षक तथा साहित्यिक कवी संमेलनाध्यक्षपदी कमलेश गोसावी

⚡कणकवली ता.१३-: १ नोव्हेंबर २०२२ रोजी काठमांडू, नेपाळ येथे भारत-नेपाळ हिंदी शिक्षक तथा साहित्यिक कवी संमेलन होत आहे. दोन्ही देशाचे जवळपास शंभर हिंदी शिक्षक तथा साहित्यिक या कवी संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. या कवी संमेलनाध्यक्ष पदी माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी मालवण या शाळेचे हिंदी शिक्षक तथा प्रसिध्द कवी कमलेश गोसावी यांची निवड झाली आहे. तर स्वागताध्यक्ष पदी नेपाळच्या डॉ. संगिता ठाकूर यांची निवड झाली आहे.


सदर निवड केंद्रिय मुख्य समन्वयक उस्मान मुलाणी व मुख्य संयोजक कैलाश जाधव यांनी घोषीत केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर आलेले के द्रिय गृह राज्य मंत्री तथा राजभाषा समितीचे सदस्य अजयकुमार मिश्रा यांनी कमलेश गोसावी यांचे विशेष अभिनंदन केले आहे. शिवाय सुरत, गुजरात येथे होणाऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला निमंत्रित केले आहे.

कमलेश गोसावी हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांचे संग्रह कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. लवकरच त्यांचा हिंदी भाषेतील कवितासंग्रह प्रकाशित होणार आहे. २०१९ ला पणजी गोवा येथे झालेल्या शिक्षक संमेलनाच्या अध्यक्षपदी कमलेश गोसावी यांची निवड झाली होती.

You cannot copy content of this page