⚡कणकवली ता.१३-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजप चित्रपट कामगार आघाडी, सिंधुदुर्ग जिल्हा एक अनोखी स्पर्धा ” मी भारतीय रिल्स स्पर्धा 2022″ आयोजित करीत आहे.
यामध्ये स्पर्धकांनी रील्स करून पाठवायचे आहे. पहिल्या तीन यशस्वी रिल्सना रोख पारितोषिक तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल .
रील्सचे शीर्षक असेल “मी भारतीय”. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एक रिल्स पाठवता येईल. रिल्समध्ये आशय भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेली असल्यामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्राम यातील घटना , प्रसंग , व्यक्तीविषयी अथवा केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान , गरीब कल्याण योजना , मुद्रा योजना , प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अथवा केंद्र सरकारच्या इतर विविध योजना त्यासंबंधीत असावा.रिल्स मधील भाषा , चित्रण आणि सादरीकरण संयमित असावे. रिल्स यापूर्वी प्रसारित झालेली नसावी .
व्हाट्सएप मोबाईल .अंकित-9657315672/ओंकार-8975480602 यांचेकडे
17 ऑगस्टपर्यंत रिल्स पाठवायचे आहेत . 22 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाईल .असे आवाहन करण्यात आले आहे.
