Headlines

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . वसंत गवसची जिल्हास्तरीयबुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.०९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा नाबर इंग्लिश स्कूल, बांदा येथे सोमवार दि. ७.०९.२०२६ रोजी संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १९ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या इ . १० वी तील कु . वसंत संदिप गवस याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे .कु . वसंत गवस जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सावंतवाडी तालुक्याचे
प्रतिनिधित्व करणार आहे.
कु . वसंत याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा तसेच त्याच्या पालकांनीही मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . वसंत गवस याचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page