Headlines

साक्षी वंजारी यांनी”गोकुळच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सतेज पाटील यांचे केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२८-: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी यांनी सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखविलेला विश्वास हा सहकार क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरुवात असून, जनविश्वास, विकासाभिमुख राजकारण आणि प्रामाणिक कार्याचा हा विजय असल्याचे सौ. साक्षी वंजारी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कोल्हापूरच्या काँग्रेसच्या महिला नेत्या वेदवती पाटील, अॅड. समीर वंजारे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण केसरकर, पन्हाळा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन पाटील, प्रमोद गायकवाड, तालुका काँग्रेसचे सचिव राजू म्हामूलकर, बाबुराव ढवन, सारंग तळेकर, इंद्रनील मेंगाणे व रणजित पाटील आदी उपस्थित होते. सहकारातून समृद्धी, नेतृत्वातून विकास आणि जनविश्वासातून विजय मिळविणाऱ्या सतेज उर्फ बंटी पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी सौ. साक्षी समीर वंजारी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.”

You cannot copy content of this page