Headlines

पालकांसाठी नाथ पै जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा व शब्दकोडे स्पर्धा संपन्न…

बॅ. नाथ पै सेवांगणचा उपक्रम..

⚡मालवण ता.२७-:
शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, या उद्देशाने मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून सुमारे ३३ पालकांनी सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ च्या औचित्याने बॅ. नाथ पै सेवांगणच्या ना. ग. गोरे सभागृहात पार पडल्या. या वेळी व्यासपीठावर बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा- तोरसकर, सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कार्यकारिणी सदस्य दीपक भोगटे आणि कार्यकारिणी सदस्य डॉ. सुमेधा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दीपक भोगटे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सेवांगणमध्ये पाल्य शिक्षण घेत असताना त्यांच्या पालकांनाही स्पर्धा परीक्षांविषयी माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेचे सूत्रसंचालन नेहा हुनारी यांनी केले. शैलेश खांडाळेकर यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती बुवा तोरसकर, ग्रंथपाल ऋतुजा केळकर, गौरी केळुसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष योगदान दिले.

या स्पर्धेतील विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांचा २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात साहित्यिकांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page