Headlines

तारकर्लीतील नौका जळीत दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला वैभव नाईकांकडून मदत

मालवण (प्रतिनिधी)

चार दिवसांपूर्वी तारकर्ली येथे कांदळगावकर रापण संघाच्या कावनाला आग लागून रापण नौका जळाल्याच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत माजी आमदार तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेमुळे हादरलेल्या कांदळगावकर कुटुंबीयांची भेट घेऊन वैभव नाईक यांनी त्यांना धीर दिला. तसेच ठाकरे शिवसेनेच्या वतीने पीडित कुटुंबाला यावेळी तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, पूजा करलकर, राधिका मोंडकर, उमेश मांजरेकर, राजू मेस्त्री, गुंडू कांदळगावकर, राजाराम खराडे, अनिल टिकम, पप्पू चिंदरकर, दीपक लोणे, प्रभाकर राझम, अनिल केळुसकर, शाखाप्रमुख आबा केळुसकर, यतीन झाड यांच्यासह स्थानिक नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page