Headlines

“सांगेलीतील सातेरी मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाला अखेर सुरुवात…

आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कामाला प्रारंभ; संजू परब यांनी दिलेला शब्द पाळला..

⚡सावंतवाडी ता.२७-: गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या सांगेली येथील श्री सातेरी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांसह सातेरी मातेच्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेत शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सातेरी माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांना या रस्त्याच्या डांबरीकरणाचा मोठा फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्णत्वास येत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर तसेच आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणारे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.”

You cannot copy content of this page