Headlines

वेंगुर्ला शहरात २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ई-कचरा संकलन अभियान…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला नगरपरिषद, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शहरात इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-वेस्ट) संकलन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरात
हॉस्पिटल नाका, वेंगुर्ला, दाभोली नाका, वेंगुर्ला, वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय व घोडेबाव गार्डन, वेंगुर्ला ही
चार संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली असून, ही केंद्रे २८, २९ आणि ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
नागरिकांनी
आपल्या घरात पडून असलेले वापरात नसलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य – जुने मोबाईल फोन, चार्जर, केबल्स, इअरफोन, कीबोर्ड, माऊस, संगणकाचे सुटे भाग, जुने रिमोट, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर ई-कचरा आपल्या जवळच्या संकलन केंद्रावर जमा करावा, असे नगरपरिषद मार्फत आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page