Headlines

नक्षत्रा जावकर हिची विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी निवड

मालवण (प्रतिनिधी)

क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या तर्फे जय गणेश इंग्लिश स्कूल, मालवण येथे संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या जिल्हा टेबलटेनिस क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील नक्षत्रा परेश जावकर हिने प्रभावी खेळी केल्याने तिची विभाग स्तरासाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी नक्षत्रा हिला स्पर्धेस सौ. स्नेहा चंद्रशेखर बर्वे यांचे सहकार्य लाभले. नक्षत्रा हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. किरण जी ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page